अमळनेर:- राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवमतदारांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा तर्फे प्रताप महाविद्यालयात २५ रोजी करण्यात आले होते.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही आर पाटील, शहर अध्यक्ष विजय राजपूत, युवा मोर्चा विधान सभा क्षेत्र प्रमुख कुणाल गिरासे व युवा मोर्चा पदाधिकारी योगिराज चौहान, राकेश पाटील, गोकुळ परदेसी, निनाद जोशी, समाधान पाटील, शितल देशमुख, सौरभ पाटील, हिरालाल पाटील, पंकज भोई तसेच युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने नवमतदार हजर होते.