अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मंसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. विश्वनाथ पाटील हे होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही.एस. देसले हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.माधव वाघमारे यांनी केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. व्हि.डि.पाटील यांनी आपल्या मनोगतात भारतातील राजकीय मतदान पद्धती,भारतातील लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन केले. अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले यांनी स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या लोकशाहीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण हिने,तर आभार मुकेश बैसाणे याने मानले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.