अमळनेर :- अखिल भारतीय साहित्य संमेलनातील प्रकाशन कट्ट्यावर दि २ ते ४ या तीन दिवसात विविध विषयांवरील कथा,कादंबऱ्या, कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आल्या.
प्रकाशन कट्ट्यावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे, डॉ.मिलिंद जोशी,उषा तांबे,वि. दा.पिंगळे,नरेंद्र पाठक,कुलगुरू माहेश्वरी सर,प्राचार्य कांचन, जगताप, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील,कवी अशोक सोनवणे, श्यामकांत भदाणे,रमेश पवार या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. तर यावेळी,धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, संभाजीनगर, बुलडाणा, पेन या ठिकाणाहून आलेल्या ५५ ते ६० पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन प्रमुख म्हणून डॉ.प्र. ज. जोशी, गोकुळ बागुल, प्रमोद बाळू पाटील यांनी केले.