अमळनेर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मुडी प्र. डांगरी विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती विश्वनाथ पाटील हिला सांघिक स्पर्धेत राज्यस्तरीय सिल्वर पदक मिळाले आहे.
यापूर्वी तिने जिल्हास्तर व विभागीय स्तरावर यश प्राप्त करून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड झाली होती. जिल्हा क्रिडा संकुल बारामती जि. पुणे येथे पार पडलेल्या या 19 वर्षांखालील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये लातूर व मुंबई संघाला नमवून त्यांनी ही कामगिरी केली. तर अंतिम सामन्यात अमरावती संघाशी लढत दिली. तीला क्रीडा प्रशिक्षक प्रा. विजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुलचे चेअरमन अविनाश पाटील, ग्राम विकास शिक्षण मंडळाचे जयवंतराव पाटील, देविदास पाटील यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.