नाट्यकर्मी शंभू पाटील यांच्या निवेदनास व सहकाऱ्यांच्या गायनास रसिकांची दाद…
अमळनेर:-शिक्षणाच्या जगात निरक्षर असली तरी जीवनाचे व जगण्याचे मूल्य आपल्या अहिरानी बोलीतून सांगून जीने लाखोच्या हृदयात व पुस्तकात स्थान मिळविले आहे अशा खान्देश कन्या बहिणाबाईच्या गीतांवर आधारीत जळगावच्या परिवर्तन संस्थेने सादर केलेला ‘ अरे संसार संसार’ या गीतांनी शनिवार,3 फेब्रुवारीची रात्र वाह वाह आणि दर्दी रसीकांच्या टाळ्याच्या कडकडाटात फुलून गेली.
तब्बल साडे तीन तास चाललेल्या कार्यक्रमात परिवर्तनचे अध्यक्ष नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी केलेले बहारदार निवेदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले गायन दर्दी रसीकांच्या हृदयावर कोरली गेलीत.
बहिणाबाईच्या माझी माय सरसोती, बाप्पाजीची, माहेराला जाण, अरे खोप्यामधी खोपा, हिवाळ्याचा थंडवार यासारख्या विविध कवितांचे सादरीकरण झाले.