अमळनेर:- तालुक्यातील पळासदडे येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनी ठिबक नळ्यात फसलेल्या दोन काळवीटांना जीवदान मिळाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील पळासदडे शिवारात गट क्रमांक 102/4 मध्ये दिनांक ६ रोजी सकाळी १०.३० वाजता दोन काळवीट हरभरा पिकांमध्ये ठिबकमध्ये अडकून बाहेर पडण्यासाठी आटापिटा करत असताना शरद फकिरा पाटील यांना दिसले. त्यांनी तात्काळ शेतमालक उमाकांत बेहरे यांना फोन करून सांगितले. सदर शेतकरी उपसरपंच गणेश पाटील यांना घेऊन शेतात गेले. सदर वन्य प्राणी असल्याची ही बाब वनाधिकारी यांच्या कानावर टाकली. त्यानंतर गणेश पाटील व शरद पाटील यांनी विड्याच्या सहाय्याने काळवीटांचा कंठ मोकळा केला व त्यांना जीवदान दिले. यात सदर शेत मालकाचे पिकासह सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले.