अमळनेर:- तालुक्यातील दोन इसम बेपत्ता झाले असून पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पैलाड येथील भोई वाड्यातील प्रवीण भगवान भोई वय ४५ हा ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सेंट्रींग कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. या घटनेचे वृत्त कळताच त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने उपचारात त्यांचा वेळ गेला म्हणून उशिराने आई रेखाबाई भोई यांच्या खबरीवरून पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
तर हिम्मतराव पंढरीनाथ पाटील (वय ७४) यांचे घरात वाद झाल्याने ५ रोजी दुपारी दीड वाजता मोबाईल घरी ठेवून निघून गेले. ते आपल्या मूळ गावी नगावला गेल्याचे समजले मात्र त्यांचा मुलगा ६ रोजी सकाळी त्यांना भेटायला गेला असता तेथूनही हिम्मतराव पाटील सकाळीच निघून गेले. मुलगा नंदकिशोर जाधव याने दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.