अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर येथील अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमधील एकाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जैतपिर येथून ३१ डिसेंबर २१ रोजी १७ वर्षीय मुलीला फुस लावून अजय कतला ( रा. भोपाल, म प्र.) नामक इसमाने पळवून नेले असून त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तुमची मुलगी माझ्यासोबत आहे, पोलिसात गेल्यास तिला मारून टाकू अशी धमकी दिल्याने उशीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून मारवड पोलिसात भादवि कलम ३६३, ५०७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. उ. नि. वैभव पेठकर करीत आहेत.