अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील कै.आबासाहेब एस.एस.पाटील माध्य. विद्यालयात दुपारच्या सत्रात प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ.ललित मोमाया यांचे इ. ५ वी ते १० वी पर्यंतच्या मुलांसाठी व्याख्यान संपन्न झाले.
मोबाईलचे फायदे, तोटे, उपयुक्तता, महत्व, अती वापर घातकच या किशोरवयीन मुलांना कशी आहेत, हे विविध देश- विदेशातील अहवाल दाखवून माहिती दिली. सुमारे दोन तासांच्या या व्याख्यान व चर्चा सत्रात मोबाईल सारख्या आभासी उपकरणात कसे उपयुक्त ठरावे, त्याचा शारीरिक, मानसिक, भावनिकतेवर गंभीर परिणाम होत आहे असे अहवाल दाखविले. आंतरजाल हे ज्ञानाचे भांडार आहे. पण ते गरजेपूरते, मर्यादित वेळेत निवडून घेता आले पाहिजे. अतिवापर हा जगण्याला वर्ज्य असतो. या वयात स्वध्ययन करावे, प्राणायाम, योगासने करावीत, रोजनिशी लिहावी, मैदानात खेळावे, आपले छंद जोपासावेत जीवन बहरून येईल असे सखोल ज्ञान डॉ.मोमाया सरांनी दिले. मुलांनी एकाग्रतेने ते आत्मसात केले. या व्याख्यान व चर्चा सत्रासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, आर. पी. पाटील, शिक्षक वृंद, कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.