धर्मसभा,संन्यास दीक्षा विधी, आश्रम मंदिर उद्घाटनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर:- श्री वर्धनस्थ बिडकर पिढी कुलवंदन त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव आज २ व ३ मार्च रोजी अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील महानुभाव प्रणवा आश्रम येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सर्वश्न श्री चक्रधर स्वामी महाराजांनी स्थापित केलेल्या ईश्वरीय भक्ती मार्गाची परंपरा गेल्या ८०० वर्षापासुन चालविल्या जात आहे. त्या अनुषंगाने श्री बिडकर पिढी मध्ये परमेश्वर अवतार श्री गोविंदप्रभु महाराजांची श्री मुकुटावरील केस व श्रीमुखातील दाढीची करप परंपरेने चालत आलेले आहे. त्या प्रमुख देवपुजन वंदनास साक्षी करुन हा कार्यक्रम दर ३ वर्षानी संपन्न केला जातो. २ ते ३ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमाला धर्मसभा सन्यास दिक्षा विधी प्रणव आश्रम मंदीर उदघाटन पंचवतार उपहार, श्रीकृष्ण मंदीर रणाईचे उदघाटन केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्य कुलाचार्य प.पु.प.म. श्री वर्धनस्थ बिडकरबाबा व त्यांच्या शिष्यगाद्या व नातूगाद्या व बिडकर कुटूंबाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा…
आज दि 2 रोजीचे कार्यक्रम- सकाळी 7 वाजता गीतापाठ पारायण,12 वाजता पंचवतार उपहार विधी,1वाजता महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजता देवाची मिरवणूक, रात्री 9 वाजता कीर्तन सम्राट श्री कमळकर बाबा यांचे कीर्तन
दि 3 रोजी-पहाटे 5 वाजता देवास मंगल स्नान बिडावसर,7 वाजता पारायण,8.30 वाजता ध्वजारोहण, 9 वाजता श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन,प्रणव आश्रम उद्घाटन,9.30 वाजता धर्मसभा प्रारंभ, स्वागत समारंभ,11 वाजता दीक्षा विधी,12 वाजता खिचपुरी विडा उपहार महोत्सव, दुपारी 1 वाजता भोजन महाप्रसाद