अमळनेर:- प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी देव लर्न इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या सोबतीने डाटा अनॅलॅटिक्स या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले.
हा प्रशिक्षण वर्ग दिनांक 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 पर्यंत म्हणजे वीस दिवस दररोज तीन तास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले या कोर्सची दिनांक 6 मार्च 2024 रोजी समारोप करण्यात आला. या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना एक्सल, पावर बी आय, एसक्यूएल, पायथॉन याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आले. सदर कोर्स अंतर्गत महाविद्यालयातील 136 विद्यार्थी सहभागी होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली या कोर्स द्वारे विद्यार्थ्यांना उत्तम असे डाटा एनॅलेटिक्सचे ज्ञान अवगत झाल्याची प्रतिक्रिया समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी सांगितले की, हे ज्ञान त्यांना भविष्यात नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देणार आणि यामुळे ते महाविद्यालयाचे आभारी आहेत. सदर ट्रेनिंगच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर देव लर्न इन्स्टिट्यूटचे समन्वयक संजय कदम, प्रशिक्षक अमन मिश्रा, सर्वेश देवडे, रुसा समन्वयक प्रा. डॉ. मुकेश भोळे, खानदेश शिक्षण मंडळाचे सहचिटणीस तथा सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव आणि कोर्स समन्वयिका गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. नलिनी पाटील, प्रा. डॉ. वंदना भामरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. बी. पटवर्धन यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोर्सचे सह समन्वयक प्रा. उमेश येवले यांनी व आभार प्रा. रोहन गायकवाड यांनी केले. या कोर्ससाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक चौधरी, कैलास पाटील त्याच पद्धतीने गणित विभागाच्या प्रा. प्रियंका पाटील व कामिनी बोरसे यांचे सहकार्य लाभले.