ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्याचे वाटप…
अमळनेर:- तालुक्यातील निसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेस दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी निसर्डीचे सुपूत्र व सध्या सुरत येथील रहिवासी लक्ष्मण पाटील व बबलु पाटील यांनी त्यांचे उद्योजक मित्र ओमप्रकाशजी शिवहरे यांच्यासह सदिच्छा भेट दिली. शाळेचे अंतरंग व बाह्य परिसर पाहून प्रसन्नता व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत शालेय उपक्रमांची माहिती जाणून घेतली. ओमप्रकाशजी शिवहरे यांनी शाळेस ११००० रूपये रोख देणगी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. आलेल्या व्यापारी मित्र परिवारातील सदस्यांचा निसर्डीचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पाटील, योगेश पाटील, दिपक पाटील, सुकलाल पाटील प्रविण पाटील शाळेतील शिक्षक भरत जाधव सर, भागवत मोरे सर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
लक्ष्मण पाटील हे निसर्डीचे माजी सरपंच भिका पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत तर विद्यमान सरपंच वैशाली पाटील यांचे जेठ आहेत. त्यांनी गावातील महादेव मंदिरास स्वखर्चाने रंगरंगोटी केली आहे. तसेच ग्रामस्थांना वेळोवेळी मदत करत असतात. सुरत येथील त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी त्यांची धडपड सुरू असते.