मानधन वाढीसाठी पाठपुरावा केल्याने पोलीस पाटलांनी मानले आभार…
अमळनेर:- पोलीस पाटलांच्या मानधन वाढीसाठी पाठपुरावा केल्याने अमळनेर येथे आ. मंगेश चव्हाण व माजी आमदार स्मिता वाघ यांचा पोलीस पाटील संघटनेकडून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील ३८ हजार पोलीस पाटील गेल्या साडेचार वर्षापासून मानधन वाढीच्या प्रतीक्षेत होते, पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन भेटत होते म्हणजे २१६ रुपये प्रति दिवस प्रमाणे, पोलीस पाटील हे गावाचे प्रमुख पद असल्यामुळे त्यांना बाहेरगावी कामासाठी अथवा व्यवसायासाठी जाता येत नव्हते, कारण त्याच्यावर गाव सांभाळण्याची जबाबदारी असते, एवढ्या कमी मोबदल्यात गेल्या अनेक दिवसापासून पोलीस पाटील आपले कर्तव्य पार पाडत होते. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी मानधन वाढीची घोषणा केली आणि पोलीस पाटलांनी एकच जल्लोष केला चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वेळोवेळी मानधन वाढीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी आभार म्हणून मंगेश चव्हाण यांचा व मा.आ. स्मिता वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, जिल्हा सचिव लखीचंद पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष गोविंदा शिंदे, धरणगाव तालुका अध्यक्ष किशोर भदाणे, यांच्यासह संजय पाटील दापोरे, रवींद्र पाटील बिलखेडा, विलास पाटील जानवे, भागवत पाटील मंगरूळ,डॉ. दत्ता ठाकरे वावडे, रामचंद्र चौधरी शिरसाळे, विनोद बोरसे सात्री, सुभाष पाटील अंतुर्ली, रवी पवार गंगापुरी, विशाल पाटील गलवाडे, गणेश भिल हींगोणे, भाऊसाहेब पाटील शहापूर, महेश पाटील धावडे, संजय पाटील पळासदळे, छोटू ठाकरे धानोरा, कविता पाटील टाकरखेडा, प्रतिभा देसले दहीवद, तनुजा पाटील लोन खुर्द, भावना पाटील चौबारी,रेखा पाटील खापरखेडे, मनीषा पाटील खेडी, मीना महाजन पिंपळी, अश्विनी पाटील फाफोरे, गोविंदा पाटील जैतपिर, गोविंदा पाटील राजोरे यांच्यासह इतर पोलीस पाटील हजर होते.