जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा घेतला निर्णय…
अमळनेर:- मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी ३० ऑक्टोबर रोजी बंद पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० व ५०० रुपयांचे मुद्रांक विक्री बंद करू नये, कमिशन ३ टक्केवरून १० टक्के करण्यात यावे, मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने मिळावेत, मुद्रांक विक्री मर्यादा १० हजारा वरून एक लाख करण्यात यावी , फ्रांकिंग देखील मुद्रांक विक्रेऱ्यांकडून करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी ३० रोजी बंद पुकारला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्ता संदानशीव यांनी दिली.