अमळनेर:- कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील अर्थशास्त्र विभागांतर्गत 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त “जागो ग्राहक, जागो “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी “जागो ग्राहक, जागो “या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि कर्तव्याची माहिती दिली. जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो या मागची पार्श्वभूमी सांगितली. ग्राहक शिक्षण अधिकार, तक्रार निवारण्याचा अधिकार, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, ग्राहक जागृतीचा अधिकार या ग्राहकांच्या मूलभूत हक्काविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. जितेंद्र माळी हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ई- कॉमर्स विषयी मार्गदर्शन केले. ई-कॉमर्स हे ग्राहकांसाठी खरेदीचे सर्वाधिक पसंतीचे माध्यम जरी असले तरी सध्या यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. या फसवणुकीपासून संरक्षण मिळावे म्हणून कायद्याची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा. विजयकुमार पाटील यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.व्हि. डी. पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा.डॉ. पवन पाटील प्रा .डॉ. नंदा कंधारे, प्रा. डॉ. देवदत्त पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.