
जित स्टुडिओतर्फे आयोजित कार्यक्रमाचे नागरिकांनी केले कौतुक…
अमळनेर:- येथील जित स्टुडिओ तर्फे पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना मानवंदना सह देशभक्ती गीत कार्यक्रमाचे शहरातील पोलीस मैदानात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाला पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून सलामी देण्यात आली. माजी आमदार स्मिताताई वाघ, जिप सदस्या जयश्री पाटील व निवृत्त सैनिक जवानांनी मेणबत्ती लावून देश भक्तीपर घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले. याप्रसंगी पुलवामा घटनेला उजाळा म्हणून त्या घटनेचा नाट्य रुपात सादरीकरण करण्यात आले. हे नाट्य पाहून उपस्थितांच्या अंगाला शहारे आल्याचा अनुभव आला. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांना परिसरातील अनेक गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात देश भक्ती पर गीत गावून मानवंदना दिली. रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन करतांना शहीद जवानांच्या कर्तुत्वाला उजाळा देत देशासाठी मौल्यवान जीव अर्पण करणाऱ्या जवानांना शब्दरुपी मानवंदना दिली व तरुणांना सैन्यात भरती होण्यास प्रवृत्त केले व उपस्थितां मध्ये देश भक्तीपर चेतना निर्माण केली. जितू स्टुडिओचे संचालक जितेश संदानशिव यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित सैन्य दलातील सेवा निवृत्त इन्स्पेक्टर शिवाजी पाटील, हवालदार विनोद बिर्हाडे,सुभेदार शशिकांत वाघ, हवालदार एल बी बोडरे,सब इन्स्पेक्टर विजय शिसोदे, हवालदार ईश्वर चौधरी, हवालदार दिनेश सपकाळे, हवालदार आत्माराम बडगुजर, प्रल्हाद मोरे,विजय सूर्यवंशी,सुभेदार अभिमन्यू जाधव,हवालदार धनराज पाटील, हवालदार विवेक पाटील, हवालदार विजय सूर्यवंशी, हवालदार राजेंद्र जाधव आदीचें अनमोल मार्गदर्शन लाभले.




