धुपे खुर्द येथील पती ,सासू व दिर विरुद्ध पोलिसांत हुंडाबंदीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील २२ वर्षीय विवाहितेचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर सहा महिन्यांत सासरच्यांनी किराणा दुकान टाकण्यासाठी व शेतीसाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून माहेरी सोडून दिले , पीडितेने महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली तरी नांदवयास घेऊन गेले नाहीत म्हणून तक्रार निवारण समितीच्या पत्रानुसार पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध हुंडाबंदीच्या कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे
निम येथील २२ वर्षीय पीडितेचा धुपे खुर्द येथील गणेश रामदास कोळी यांच्याशी नोव्हेंबर २० मध्ये विवाह झाला होता ,सहा महिन्यांनी सासर कडील मंडळीने माहेरून दोन लाख रुपये किराणा दुकान टाकण्यासाठी व शेती करण्यासाठी आणावेत म्हणून मानसिक छळ चालू केला. पीडितेने हकीकत आईवडील यांना सांगितली, मात्र मुलबाळ झालं की सगळे व्यवस्थित होईल म्हणून आईवडील यांनी समजूत घेतली,शेवटी छळ वाढतच गेला व मार्च २१ मध्ये पतीने विवाहितेला माहेरी सोडत तिच्या आईवडीलांना दारू पिऊन शिवीगाळ करून निघून गेला. म्हणून महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली. मात्र सासरची मंडळी नांदवयास घेऊन गेले नाहीत म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला तक्रार निवारण समितीचे पत्राच्या आधारे पीडित विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या फिर्यादीवरून पती गणेश रोहिदास कोळी, दिर किरण रोहिदास कोळी, सासू हिरकणबाई रोहिदास कोळी (सर्व राहणार धुपे खुर्द ता चोपडा) यांच्या विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात हुंडाबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत