तिघांसह इतरांनी दोघांना केली जबर मारहाण, गुन्हा दाखल…
अमळनेर:- शहरातील एका हॉटेलमध्ये रंगपंचमी खेळण्यावरून वाद उदभवल्याने तिघांसह इतरांनी दोघांना जबर मारहाण केल्याची घटना २५ रोजी दुपारी सव्वा चार वाजता घडली.
सुमित हरिशकुमार राहुजा रा सिंधी काँलनी हा आपल्या मित्रांसह चोपडा रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी तेथे गणेश दामू जाधव व राजू दामू जाधव हे टेबलवर रंगपंचमी खेळत होते. हॉटेलचे वेटर विकी दरडा त्यांना हॉटेल खराब होत आहे तुम्ही रंगपंचमी खेळून नंतर या असे सांगत असताना दोघांनी वेटरला शिवीगाळ केली. हे भांडण आवरायला सुमित राहुजा गेले त्यांनाही दोघांना शिवीगाळ केली. सुमित घरी जाण्यासाठी हॉटेल बाहेर निघाला तेव्हा राजू व गणेश यांनी आणखी काही जणांना फोन करून बोलावून घेतले. त्यात ताडेपुरा येथील विकी धनगर देखील होता. या सर्वांनी सुमितला जबर मारहाण केली. सुमीतचे वडील त्याला घ्यायला आले त्यांनाही तिघांसह इतरांनी मारहाण केली. त्यात त्याची सोनसाखळी तुटून नुकसान झाले. सुमित उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेला. परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.