अमळनेर:- तालुक्यातील मारवड, येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधनी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधनी समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकून आजच्या तरुणांनी महाराजांची जीवन मुल्ये प्रत्यक्षात अंगीकारण्याची गरज असल्याचे मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धती व भाष्य केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.