अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती व दानशूर मंडळीकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तराचे वाटप करण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचा ठराव पारित केला. तसेच गावातील दानशूर दात्यांनी त्याच्या परीने मदत गोळा करून विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व प्रमुख उपस्थितीत शालेय गणवेश व दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख अशोक सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती वाडीले, सरपंच मिनाबाई पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरिफ खान, उपाध्यक्ष रवींद्र कोळी, पोलीस पाटील पंजाबराव वाडिले, ग्रा. प. सदस्य दीपक पाटील, योगेश शिसोदे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र शिसोदे, वैभव शिसोदे, निलेश पाटील, नरेश बडगुजर, मुख्याध्यापक किशोर मगर, शिक्षिका उषा पाटील, सुनिता पाटील, श्रीमती पाटील मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.