
सचिन खंडारे मित्र परिवारातर्फे केले होते आयोजन…
अमळनेर:- शहरातील वार्ड क्रं 13 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सचिन मधुकर खंडारे व सचिन भाऊ मित्र परिवार तर्फे सालाबादप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर येथे करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिकाचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.







