
अमळनेर:- येथे क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या खंबीर साथीने शेतकरी, वंचित घटक व स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील मागास घटकांच्या हक्कांसाठी लढा उभारणारे थोर समाजसुधारक, भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु करणारे स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९७ जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन, शहराध्यक्ष प्रताप पाटील, क्षत्रिय काच माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे अध्यक्षा मंगला रतीलाल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, गुलाबराव महाजन, बी आर महाजन, महाजन हॉटेलचे संचालक गोटू शेठ, ऍड सुदाम श्रावण महाजन,रविंद्र ओंकार महाजन, कैलास गजानन महाजन, मनोहर दयाराम महाजन, कैलास ओंकार महाजन, न्यू महाजन मेडिकलचे दीपक महाजन, प्रवीण बारकू महाजन, परिश्रम मतिमंद विद्यालयाचे चेअरमन डॉ. योगेश महाजन,अर्बन बँकेचे संचालक लक्ष्मण पांडुरंग महाजन (पप्पू), प्रा. प्रकाश महाजन, राजेंद्र भास्कर महाजन, सुकेश्वर संस्थेचे अध्यक्ष संजय महाजन, प्रगती क्लासेसचे संचालक संदीप महाजन,अनिल महाजन, हेमंत बाबूलाल महाजन, सुनील महाजन, सुदाम महाजन, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष चित्रकला प्रकाश महाजन, अर्चना महाजन, यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, क्षत्रिय माळी समाज मंडळाचे कार्यकारी सदस्य महिला मंडळाच्या पदाधिकारी व समता सैनिक, ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

