अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील झोपडीला आग लावून १२ बकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला भरत बापू मोरे यांच्या विरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झाडी येथे १५ रोजी पहाटे सुरेखाबाई शिवदास पवार यांच्या झोपडीला आग लागल्याने आरडाओरड सुरू झाली तेव्हा सुरेखाबाई व त्यांचे कुटुंबीय झोपडीकडे गेले तेव्हा भरत बापू मोरे हा झोपडीकडून महेश पाटील यांच्या म्हशी बांधलेल्या खळ्याकडे पळताना दिसला. आगीत सुरेखाबाई यांचे बकऱ्या व चारा असे सुमारे १ लाख २७ हजाराचे नुकसान झाले. महेश पाटील यांची म्हैस व पारडू देखील जळाले. १८ रोजी भरत मोरे हा हातात कुर्हाड घेऊन दमदाटी करू लागला. त्यावेळी सुरेखा बाईने त्याला विचारले की झोपडीला आग तू लावली का? त्यावेळी हो मी आग लावली तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगू लागला. पुन्हा १९ रोजी तो हातात कुर्हाड घेऊन दमदाटी करू लागला त्यामुळे भरत मोरे यानेच आग लावल्याचे खात्री झाली म्हणून सुरेखाबाईने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भरत मोरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत.