सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- शासनाच्या माझी वसुंधरा अभियान मोहिमेत सहभागी असलेल्या दहिवद येथे ग्राम पंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात प्लॅस्टिक मुक्ती रॅली काढून समस्त ग्रामस्थांना आपले गाव प्लॅस्टिक मुक्ती करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
माझी वसुंधरा या अभियानाच्या विशेष भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक मुक्ती चळवळीचा संदेश घराघरात रुजावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्या वापरात आणाव्यात असे आवाहन ग्राम पंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले. संपुर्ण गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.गावातील ग्रामस्थ, दुकानदार,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या हस्ते कागदी पिशव्या वाटप करण्यात आल्यात. तसेच काढलेल्या प्रबोधन रॅलीतून गावातील घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक मुक्त आपले गाव, सांडपाणी व्यवस्थापन,गाव परिसर स्वच्छ, पाणी आडवा पाणी जिरवा,वृक्ष लागवड व शौचखड्डा आदी संकल्पनेचे संदेश देण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून हरित क्रांतीची शपथ घेण्यात आली.