अमळनेर:- केंद्रीय सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय धुळेच्या शिक्षक पालक संघावर अशासकीय सदस्य म्हणून तुषार सैंदाणे यांची निवड करण्यात आली.
धुळे येथील जवाहर नवोदय विद्यालय समिती 2022 ते 23 करिता शिक्षक पालक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार सैंदाणे यांची क्रियाशील पालकांचे प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून शिक्षक पालक संघावर बिनविरोध निवड करण्यात आली. तुषार सैंदाणे हे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सदैव झटणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांची शैक्षणिक क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या हक्काच्या मागणी करिता आणि योग्य त्या लढा देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याप्रसंगी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य उषाजी माने तसेच उपप्राचार्य विल्यम सर, दौंड सर, योगेश साळुंखे सर आणि कर्मचारी वृंद यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले. सदर निवडीबद्दल खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, मा. आ. स्मिता वाघ, मा. आ. डॉ. बी एस पाटील, आमदार फारुख शहा, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, मा. आ. शिरीष चौधरी तसेच धुळे येथील नामवंत पॅनल जज डॉक्टर योगेश सूर्यवंशी, प्राचार्य डी एस सूर्यवंशी, ओएचडी गोकुळ धनगर, पत्रकार सुनील पाटील यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.