
अमळनेर:- तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच मांडळ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य २७ फुटी पुतळ्याचे महापूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील, सरपंच विद्या पाटील, डॉ सुनील चोरडिया, जेष्ठ पत्रकार संजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, अनंत निकम, भैरवी पलांडे, सुनील शिंपी, दत्तात्रय ठाकरे, जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मांडळ येथील शिवशाही समितीच्या सहकार्याने पुतळा उभारण्यात आला असून सर्वत्र सजावट, रोषणाई करण्यात आली. सूत्रसंचालन किरण बडगुजर व अमित पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, युवावर्ग शिवप्रेमींनी गर्दी केली होती.







