अमळनेर:- तालुक्यातील सावखेडा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नुकताच २०२४ – २०२५चा शैक्षणिक वर्षात ईयत्ता १ लीत दाखल होणाऱ्या मुलासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा व केंद्रस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लांबोळे सर हे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक बिर्हाडे सर यांनी केले. त्यानंतर प्रत्येक शाळेत मेळावा गावा -गावात दवंडी देऊन घ्यावा या विषयी माहिती व मार्गदर्शन जिजाबराव पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख चंद्रकात साळुंखे यांनी मेळावा नियोजन मुलासाठी व पालकांसाठी या विषयी माहिती देऊन मेळाव्यात प्रत्येक प्रात्यक्षिक एकुण ७ स्टॉलवर कृती युक्त पद्धतीने घेण्यात आले. केंद्रस्तरीय मेळाव्यासाठी सावखेडा केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकवर्ग व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच भानुदास पाटील उपस्थित होते. केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहांत आनंदमय वातावरणात प्रत्यक्ष कृती युक्त पद्धतीने साजरा झाला. शेवटी प्रत्येक शाळेला दाखलपात्र मुलांच्या संख्येप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यांत आले.