अमळनेर:- भगवान श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव निमित्त शहरात आज दि 21 रोजी सकाळी 7 वाजता भव्य वरघोडा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यानंतर सुजाण मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
सदर महोत्सव अंतर्गत दि 17 पासून विविध कार्यक्रम पार पडले. यात लहान मुलांसाठी 14 स्वप्न ड्रॉईंग स्पर्धा,खेलो प्रश्न के खेल, गीतगायन स्पर्धा,यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता,सर्व कार्यक्रमाना उस्फुर्त प्रतिसाद लाभला.सदर महोत्सवात आज महत्वाचा दिवस असून सकाळी 7 वाजता गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून वरघोडा स सुरुवात होणार आहे,तेथून कुंटे रोड,दगडी दरवाजा, मुंबई गल्ली, जैन स्थानक, सुभाष चौक,स्टेशन रोड, अनुव्रत भुवन,आयडीबीआय बँक, दादावाडी मंदिर,नर्मदा वाडी, शितलनाथ मंदिर तेथून सुजाण मंगल कार्यालयात समारोप होणार आहे.
सकाळी 10.30 वाजता सुजाण मंगल कार्यालयात, भगवान स्वामी महावीर जन्मकल्याणक महोत्सव कार्यक्रम पार पडतील. नंतर 2.30 वाजता महावीर स्वामी पंचकल्याणक पूजा,सायंकाळी 7 वाजता अंनहनाद भक्ती कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता विविध पुरस्कार कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन श्री सकल जैन संघ व श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीने केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ऋषभ पारेख यांनी दिली आहे.