तालुक्यातील जैतपिर शिवारात दोन दारू भट्ट्या केल्या नष्ट…
अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर शिवारात मारवड पोलिसांच्या पथकाने गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत दोघांवर कारवाई केली आहे.
सपोनि शितलकुमार नाईक, हेकॉ संजय पाटील, फिरोज बागवान, पोकॉ राजेंद्र पाटील यांच्या पथकाने जैतपिर शिवारात २२ रोजी सकाळी ही कारवाई केली आहे. जैतपिर येथे मोंढ्या नाल्याच्या काठी पांडुरंग हिरामण कोळी हा गावठी दारूची भट्टी लावून दारू निर्मिती करत असल्याची माहिती मिळाल्याने छापा टाकला असता तो पळून गेला. त्याठिकाणी १०५ लिटर कच्चे रसायन, ३० लिटर पक्के रसायन, तसेच १० लिटर तयार दारू मिळून आली. तसेच जवळच अजून एका भट्टीवर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने भट्टी लावणारा नाना सोमा कोळी हा पळून गेला. त्याठिकाणी १७५ लिटर कच्चे रसायन, २० लिटर पक्के रसायन व २२ लिटर तयार दारू असा मुद्देमाल आढळून आला. दोन्ही ठिकाणी नमुने घेवून उर्वरित साहित्याचा नाश करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.
Related Stories
December 22, 2024