२२ फुटी मंगलमय हनुमानाच्या मुर्तीने पडली सौंदर्यात भर…
अमळनेर:- येथील अंबर्शी टेकडीवर बाविस्कर परिवाराने २२ फुटी मंगलमय हनुमानाची मूर्तीची स्थापना केली असून टेकडीवरील पहिली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. हनुमानाच्या मूर्तीमुळे टेकडीचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.
मूळचे अमळनेर येथील रहिवासी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेले विजय बाविस्कर हे हनुमानाचे भक्त आहेत. त्यांनी स्वखर्चाने अंबर्शी टेकडीवर ओटा बांधून २२ फुटी हनुमानाची मूर्ती उभारली आहे. अंबर्शी टेकडीवर शहराचा पाणी पुरवठा करणारा जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्र असून टेकडी ग्रुपतर्फे तेथील वाया जाणाऱ्या पाण्यातून हजारो झाडे लावून पर्यावरण संवर्धन केले आहे. आधीच त्याठिकाणी अंबरीश राजा आणि विष्णुदेवाच्या मुर्त्या असल्याने भक्तांची गर्दी टेकडीवर असते. टेकडीवरील शुद्ध हवा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे दररोज सकाळ संध्याकाळी फिरणाऱ्यांची गर्दी असते. आणि आता २२ फुटी हनुमानाच्या मूर्ती आणि टेकडी भक्तांसाठी आकर्षण ठरणार आहे.
हनुमान जयंतीच्या उत्सवाची टेकडी ग्रुप आणि नगरपालिकेने जोरदार तयारी केली असून चोपडा रस्त्यापासून टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे.
Related Stories
December 22, 2024