गेल्या आठवडाभरात जादा फेरीतून कमावले पावणे चौदा लाख रुपये…
अमळनेर:- गेल्या आठवडाभरात सप्तशृंगी गडावर जादा बसेस सोडणाऱ्या अमळनेर एस टी आगाराला देवी पावली असून जादा फेरीतून सुमारे पावणे चौदा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
वणी येथील सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी गडावर अमळनेर आगाराच्या जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. अनेक भक्त पायी जात असले तरी परतताना ते एस टी अथवा इतर वाहनांनी प्रवास करतात. महिला आणि वृद्धांना सवलत असल्याने अनेक प्रवाश्यानी एस टी च्या या सवलतीचा लाभ घेतला. १५ एप्रिल पासून जादा बसेस गडावर सोडण्यात आल्या होत्या. तेव्हा चार फेऱ्या करण्यात आल्या होत्या. २१ पर्यंत बसेस ची संख्या वाढवण्यात आली त्यादिवशी ४८ फेऱ्या झाल्या होत्या.
अमळनेर आगाराने एकूण ११४ फेऱ्या केल्या असून २० हजार ४०६ किमी प्रवास झाला आहे. सवलत सह एस टी ने प्रति किमी ६७.४१ रुपये कमाई केली आहे. आठवडा भरात अमळनेर आगाराने सर्वसाधारण प्रवाश्यांच्या तिकिटातून रोख ९ लाख ३९ हजार ४७० रुपयांची कमाई केली आह. तर सवलतीच्या प्रवाश्यांसह १३ लाख ७५ हजार ६४४ रुपये कमाई केली आहे. गडावर सुरक्षित प्रवासासाठी जेष्ठ नागरिक, महिलांनी एस टी चा प्रवास पसंद केला होता.
Related Stories
December 22, 2024