अमळनेर:- घरात बसून टीव्ही अथवा मोबाईलमध्ये गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी साने गुरुजी विद्यालयात क्रिकेटचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाला असून उन्हाच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. पारा ४३ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने असह्य उकाडा जाणवत आहे. जनजीवन विस्कळीत झाले असल्याने शालेय विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाही. मात्र या क्रिकेट शिबिरात मुलांचा उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळत असून दीडशे ते दोनशे विद्यार्थी या शिबिरात सहभागी झालेले आहेत. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून त्या दृष्टीने प्रशिक्षक परेश सोनवणे व राकेश पवार परिश्रम घेत आहेत. सदर शिबिरासाठी संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी तथा क्रीडा शिक्षक विलास चौधरी, डी ए धनगर सहकार्य करीत असून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.