अमळनेर:- येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय खरीप हंगामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
२३ एप्रिल रोजी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी अर्पित चौहान, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपविभागीय कृषि अधिकारी,सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रशेखर साठे, अमोल भदाणे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न झाली. तालुका कृषि अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी तालुक्याची खरीप हंगामाचे नियोजित कृती कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. पं. स. कृषि अधिकारी देवेंद्र ठाकूर,अमोल भदाणे विदयुत विभाग, विमा प्रतिनिधी, वखार महामंडळ, मार्केट समिती सचिव उन्मेष राठोड, बियाणे असोसिएशनचे अध्यक्ष, कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.