भानुबेन शाह गोशाळेत भव्य कार्यक्रमाचे केले आयोजन…
अमळनेर:- शहरात येत्या 7 मे रोजी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही श्रीमती भानुबेन शाह गोशाळेत 56 भोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने शेकडो गोमताना हा भोग चढविला जाणार आहे.
अमळनेर गोमाता सेवा ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी अनेक दानदाते सढळ हस्ते मदत करीत आहे.गेल्या वर्षी याच ग्रुपच्या वतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी भानुबेन शहा गोशाळेत अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. भाविकांनी प्रचंड प्रतिसाद कार्यक्रमाला दिला होता. त्यावेळी या 56 भोग मध्ये विविध प्रकारच्या मिठाया,विविध फळ, भाजीपाला,ड्रायफ्रूट,हिरवा चारा यासह विविध 56 प्रकारच्या व्यंजनांचा समावेश होता. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेला हा कार्यक्रम अमळनेरात झाल्याने अनेकांनी कौतुक केले होते.
त्यावेळी मिळालेला प्रतिसाद पाहता या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक सौ अर्चना गिरीश वर्मा यांनी या वर्षी देखील उत्कृष्ठ नियोजन केले असून येत्या अक्षय तृतीयेच्या आधीच म्हणजे 7 मे रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी गोमाता सेवा ग्रुपचे सर्व महिला व पुरुष सदस्य परिश्रम घेत आहेत.ज्या भाविकांना या 56 भोग कार्यक्रमासाठी काही योगदान द्यावयाचे असेल त्यांनी मोबा. 9923284828 यावर संपर्क द्यावा असे आवाहन अमळनेर गोमाता सेवा ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.