शहरातील लॅबोरेटरी प्रॅक्टिशनर्स संघटनेकडून उपक्रमाचे आयोजन…
अमळनेर:- मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक सामाजिक संस्था अनोखे उपक्रम राबवत असून शहरातील लॅबोरेटरी संघटनेकडून मतदारांसाठी अनोखी सवलत देण्यात आली आहे.
मतदान केलेल्या रुग्णांना १३ मे मतदानाच्या दिवशी व दुसऱ्या दिवशीही दि. १४ मे २०२४ रोजी नमुद सर्व खाजगी लॅबोरेटरी मध्ये तपासणीच्या एकुण बिलात १० टक्के सवलत दिली जाईल. १८ वर्षांखालील मुलांच्या केसेस मधे १० टक्के सवलत दरातील तपासणीसाठी पालकांनी मतदान केलेले असावे, अशी अट घालण्यात आली आहे. अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष भटू व्हि. पाटील यांनी केले आहे. सदर उपक्रमास महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल कौन्सिलचे अमळनेर मधील “ॲक्लाप” या राज्यव्यापी संघटनेचे अधिकृत लॅबोरेटरी प्रॅक्टिशनर्सचे सहकार्य लाभत आहे.