अमळनेर:- शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपात अमळनेर तालुका तलाठी संघ सहभागी झाला आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांना काल संपाबाबत निवेदन दिले देण्यात आले. जुनी पेन्शन योजना, पदभरती यासह अन्य मागण्यासाठी हा संप पुकारला असून २३ व २४ रोजी पुकारलेल्या या संपात तलाठी सहभागी झाले आहेत. सदर निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देतेवेळी संघाचे पदाधिकारी व तलाठी बांधव उपस्थित होते.