अमळनेर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलीस दलामार्फत रुटमार्च करण्यात आला होता.
शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ मे रोजी मतदान होणार असून मतदान शांततेत पार पडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमळनेर पोलिसांनी शहरात ९ रोजी सायंकाळी ६ वाजता रुटमार्च केला.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रुट मार्च ला सुरवात होऊन भारतीय स्टेट बँक, स्टेशन रोड, कोर्ट परिसर,व महाराणा प्रताप चौकातून प्रांत कार्यालयात रुट मार्च ची सांगता करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे,केरळ पोलीस दल, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव बोरकर,अजित साळवे, सशस्त्र पोलीस दल,तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.