अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु.येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरीवर असलेले विद्युत पंप अज्ञान चोरट्यानी लंपास केले आहेत.
फापोरे बु. येथील शेतकरी मनोहर प्रभाकर पाटील, सिताराम आसाराम पाटील व मेघा विशाल पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहीरीवर विद्युत पंप लावलेले असताना दि .14 मे रोजी अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंप चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून आर्थिक नुकसान थांबवावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.