कामगिरीच्या आधारे नवीन नियुक्त्या:- महेश पाटील…
अमळनेर:- जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून कामगिरीच्या आधारे नवीन नियुक्त्या करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेश डी. पाटील यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत,भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस उदय भानू, भारतीय युवक काँग्रेस सचिव एहसास खान, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी आनंद पुरोहित यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून त्यात जळगाव जिल्हा युवक उपाध्यक्ष, सरचिटणीस व विधानसभा अध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस, ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्षांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांतच कामगिरीच्या आधारे नवीन नियुक्त्या केल्या जातील असे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी कळविले आहे.