उपविभागीय कृषी अधिकारी साठे यांच्या विक्रेत्यांना सूचना…
अमळनेर:- ठरवून दिलेल्या दराप्रमाणे खते आणि बियाणे विक्री करा, तक्रार आल्यास कारवाई केली जाईल अश्या सूचना उपविभागीय कृषी अधिकारी यांनी विक्रेत्यांना दिल्या आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे विक्रेत्यांनी खते व बियाणे विक्री करावी अश्या सूचना उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी केल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, कृषी अधिकारी अविनाश खैरनार, पर्यवेक्षक वंजारी, दीपक चौधरी यांनी बी-बियाणे विक्रेत्यांना भेटी दिल्या. यावेळी बियाण्यांची व खतांची उपलब्धता याविषयी माहिती घेत विक्रेत्यांना सूचना केल्या. शेतकऱ्यांनी दुकानदार जादा दराने विक्री करत असल्याची तक्रार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही दिला. शेतकऱ्यांनी खरेदीच्या वेळी पक्के बिल घ्यावे आणि पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन साठे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी तंत्रसहायक डी. एम. बोरसे व गणेश पाटील यांचे सहकार्य लाभले.