अमळनेर:- संत सखाराम महाराज यात्रोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या सुरेश छबिलदास पटेल यांची दहा हजार रुपये किमतीची ऍक्टिव्हा मोटरसायकल अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे.
24 मे रोजी सुरेश पटेल यांची पत्नी आणि मुलगा, (एम एच 19 डीबी २३५७) या क्रमांकाची ऍक्टिव्हा मोटरसायकल घेऊन यात्रा पाहण्यासाठी गेले असता त्यांनी ती व्यायामशाळेजवळ पार्क केली होती. मात्र साडे अकरा वाजेच्या सुमारास यात्रा पाहून परत आल्यानंतर मोटरसायकल पार्किंग केलेल्या जागी आढळून आली नाही. सुरेश पटेल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संतोष पवार करीत आहे.