शाळेतील दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे केले कौतुक…
अमळनेर:- ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये ६१ मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे ऑ. सेक्रेटरी प्रा. भरत जीवन पाटील, श्रीमती पुष्पलता अशोक पाटील (अध्यक्ष स्कूल कमिटी), श्याम अहिरे, काळू नाना पाटील व सर्व सन्माननीय शालेय समिती सदस्य यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या. मुलींना शाळेत येण्या जाण्यासाठी शासनाकडून मोफत सायकली देण्यात आल्या. शाळेत छोट्या समारंभात सायकल वाटप करण्यात आल्या. तसेच विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल नुकताच घोषित झाला. शाळेचा निकाल 97.36 % एवढा लागला. प्रथम- मृणाल शिंपी 88.80% , द्वितीय -रेणुका पाटील 85.80% ,तृतीय -नयन पाटील 81.40% अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून संस्थेच्या वतीने अध्यक्ष उदय नारायण पाटील सेक्रेटरी प्रा. भरत पाटील व स्थानिक स्कूल कमिटी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.भरत पाटील व अनंतराव मोरे यांच्याकडून वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. यावेळी जयवंतराव पाटील, सरपंच गोविंद सोनवणे, मिराबाई पाटील (चेअरमन वि.का.सो.), वसंतराव पाटील, पुंजु पाटील, डी. ए. धनगर, विजय बोरसे, योजना पाटील, रामलाल पाटील, दिलीप पाटील सर्व शालेय समिती सदस्य तसेच मुख्याध्यापिका सविता बोरसे, बापूराव महाजन, उपसरपंच कल्याणी पाटील, किरण पाटील, राजेंद्र शिंदे, नंदकुमार अहिरे, अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, पालक वर्ग व सार्वजनिक युवक मंडळ हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन- श्रीमती योगिता देशमुख व आभार प्रदर्शन गुलाब बोरसे यांनी केले.