अध्यक्षपदी केदारसिंग जाधव तर कार्याध्यक्षपदी कुणाल गिरासे यांची निवड…
अमळनेर:- अमळनेर तालुका राजपूत एकता मंचची बैठक दि 27 रोजी न्यू प्लॉट भागातील सभागृहात अध्यक्ष रणजित भीमसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी 9 जून रोजी श्री महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती अमळनेर शहरात उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर सर्वानुमते नवतरुणांचा समावेश असलेली अमळनेर तालुका महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.समितीची संपूर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष केदारसिंग कोमलसिंग जाधव(सरपंच हिंगोणे), कार्याध्यक्ष कुणाल सुरेंद्रसिंग गिरासे(दोधवत),उपाध्यक्ष-सावंत नंदूसिंग राजपूत (जैतपिर),हर्षल नरेंद्रसिंग ठाकूर (अमळनेर), स्वर्णदीप मानसिंग राजपुत (अमळनेर), सचिव-महेंद्रसिंग सुभाषसिंग परदेशी (अमळनेर), सहसचिव-मुकेश रविंद्र सिंग परदेशी(अमळनेर),खजिनदार-दिनेश यशवंत पाटील (जुनोने), सदस्य-किरण अशोक शिंदे (जैतपिर), सोमेस अनिल शिंदे (अमळनेर), नितीन तानसिंग राजपुत (खोकरपाट),अभिषेक मधुकर भोसले(कुर्हे),शिवाजी राजपुत(कळमसरे),सनी सचिनसिंग परदेशी (अमळनेर), तुषारसिंग सुशांतसिंग परदेशी (अमळनेर)
सर्व नवनियुक्त समिती पदाधिकाऱ्यांचे अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.सदर बैठकीस सर्व पदाधिकारी व राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान 9 जून रोजी सायंकाळी शहरात साजरा होणाऱ्या भव्य जयंती उत्सवात शहर व ग्रामीण भागातील सर्वच समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन राजपुत एकता मंच व उत्सव समितीने केले आहे.