कुऱ्हे बुद्रुक शिवारातील घटना, अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील कुऱ्हे बुद्रुक येथील गट क्रमांक ४९ व ५० मधील शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील साडे आठ हजार रुपयांच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली.
कुऱ्हे बुद्रुक शिवारातील महेंद्र सुभाष पाटील, मनोज अशोक पाटील, मनीषा भावे, धनसिंग पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील यांच्या शेतातील गट क्रमांक ४९ व ५० मधील सात गाळ्यातील विजेच्या खांबांवरील तीन फेज व एक न्यूट्रल अशा १ हजार ६८० मीटर तारा चोरीस गेल्याची माहिती महेंद्र पाटील यांनी कळवल्यावर अभियंता विवेक सावंत व महेंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.