मोबाईल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य नेले चोरून…
अमळनेर:- शटर व कुलूप तोडून चार दुकानातून मोबाईल , तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेल्याची घटना ९ रोजी रात्री ते १० जून सकाळच्या दरम्यान घडली.
खड्डा जीनला लागून असलेल्या दुकांनाजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भावसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे वरचे अर्धे शटर कापलेले दिसून आले त्याने दुकानदाराला घटना कळवली. दुकानदाराने दुकानावर धाव घेऊन पाहिले असता त्याच्या दुकानातील ग्राईंडर मशीन, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिकल साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरीला गेले आहे. त्याच्या बाजूला असलेल्या दोन तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाईल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून आतील टेबल सरकवला आणि दुकानातील दुरुस्तीला आलेले ८ ते १० अँड्रॉईड मोबाईल, तसेच साधे १२ मोबाईल आणि ७ ते ८ हजार रुपयांचे मोबाईलचे साहित्य चोरून नेले. चोरट्याने एव्हढेच नव्हे तर दुकानात संडास करून गेला. मयूर मोबाईलच्या एक दुकानाच्या आड असलेल्या सैय्यद इद्रीस यांचे सना इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे देखील कुलूप तोडून तांब्याच्या तारा व इतर साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरून नेले आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यात सना इलेक्टरीकल दुसऱ्यांदा फुटले आहे. त्याच प्रमाणे बाजूला असलेले संगम मोबाईल दुकान देखील आधी मागच्या बाजूने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने शटर चे दोन्ही कुलूप तोडले पण सेंटर लॉक न तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला.सैय्यद इद्रिस यांनी याबाबत ऑनलाइन तक्रार केली आहे.