अमळनेर:- येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी अक्षर पूजन करण्यात आले.आनंददायी वातावरणात बुधवारी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी येथे नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.
पहिला दिवस असल्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता. शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांचे औक्षण करून विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील प्ले ग्रुप व नर्सरीच्या मुलांकडून अक्षर पूजन व सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी मुलांचे पालक देखील उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याने अगदी आनंदाने यामध्ये सहभाग घेतला त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर सरांनी पालकांशी संवाद साधला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.