अमळनेर:- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यात ९४.९० % एवढे मतदान झाले.
अमळनेर तालुक्यात एकूण १२५७ मतदारांपैकी ११९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक शाळांनी सकाळच्या सत्रात शाळा भरवल्याने ११ वाजेपर्यंत कमी मतदान झाले होते,मात्र दुपारी १२ वाजेनंतर मतदानासाठी रांगा पहायला मिळाल्या.मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी केली होती.
तहसीलदार कार्यालय व राजसारथी सभागृह या दोन ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.झोनल अधिकारी म्हणून प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी काम पाहिले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली तर नायब तहसीलदार आर.एच.जोशी,संतोष बावणे, अव्वल कारकून आर.पी. साळुंखे, मंडळ अधिकारी पी.एस. पाटील, तलाठी जितेंद्र जोगी,ईश्वर महाजन यांनी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पीएसआय निंबा शिंदे,सफौ राजेंद्र कोठावदे,पोहेकॉ प्रमोद पाटील, योगेश सोनवणे,गणेश पाटील, पोना लक्ष्मीकांत शिंपी, पोकॉ अशोक कुमावत,अमोल पाटील, नम्रता जरे, जितेंद्र निकुंभे, सचिन पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.