अमळनेर:- भगदाड पडलेल्या घराच्या भिंतीला बांधलेला प्लास्टिक कागद फाडून घरात घुसलेल्या चोरांनी घरातील ९९ हजार रुपयाचा मुद्देमाल तर दुसऱ्या घरातील पाच हजार रुपये व एक ग्रॅम सोने चोरीला गेल्याची घटना २९ रोजी सकाळी उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगरूळ रस्त्यावर असणाऱ्या सकुंतला दुर्योधन पाटील यांच्या घरात भिंतीला बांधलेला प्लास्टिक कागद फाडून २८ रोजी रात्री प्रवेश केला व घरात लोखंडी पेटीत ठेवलेले ७० हजार रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे पेंडंट, ४ हजार रुपये किंमत असलेले १ ग्रॅम सोन्याचे पान,३ हजार रुपये किमतीचे ४ भार वजनाचे चांदीचे कडे तसेच २ हजार रुपयाचे २ भार वजनाची चांदीची चैन असा ९९ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला असून नरेंद्र उत्तम माळी यांच्या घरातून पाच हजार रुपये रोख व १ ग्रॅम सोन्याचे पान असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. शकुंतला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.