अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे खु. येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाला असून वनविभागाने पायांच्या ठश्यांची पाहणी करून सावधानतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील गोपाळ हिम्मत कोळी यांचा गोठ्यात बांधलेला गोऱ्हा सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. वनविभागाचे कर्मचारी श्री पी जे सोनवणे त्यांचे सह सुप्रिया देवरे वनरक्षक यांनी घटनास्थळी पंचनामा केला व गावातील लोकांना सावधान राहण्याबाबत सूचना दिल्या. त्याठिकाणी शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून त्याबाबत वन विभागाने पुष्टी केली आहे.