अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथील सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय येथे काल विद्यार्थिनींना मानव विकास मंत्रालय अंतर्गत नानासाहेब अशोकराव भिलाजी हिरे यांच्या हस्ते 43 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या.यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.तसेच इयत्ता 10 वी उत्तीर्ण प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक व मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.